पूजा

नवचंडी
नवचंडी हा विधी का करावा तर हा विधी सर्वविधीचा सार आहे. यात आपण कुलदेवीची पूजा करतो यामळु कुटुंबावर आलेले सर्व सकंट,अरिष्ट आणि सर्व बाधा दूर होतात. तसेच वास्तूत नवीन चैतन्य निर्माण होते. साकारामात वातावरण निर्माण होवनू आत्मिक बळ वाढीस लागते. हा विधी ३ दिवस चालतो. २ दिवस विधी व तिसऱ्या दिवशी अन्नदान करतात. हाच विधी २ दिवसात देखील करता येतो.
वास्तूशांती ज्यावेळी आपण नवीन घराचे निर्माण करतो किंवा नवीन वास्तू घेतो त्यावेळी निर्मिती पासून ते आपण राहायला येईपर्येंत अनेक संस्कार त्या जागेवर तसेच त्या वास्तूवर होतात. तसेच त्या जागेतील दोष, तसेच वापरलेल्या साहित्य चुना, विटा, वाळू, दगड यांच्यातील दोष (विज्ञानाच्या भाषेत व्हायब्रेशन ) नंतर त्रास देतात यालाच आपण वास्तू दोष म्हणतो. वास्तू दोष निर्माण होऊ नये किंवा वर सांगितलेले दोष नाहीसे व्हावे म्हणून हा विधी करावा हा तुम्ही नव्या किंवा जुन्या घरात करू शकतात हा सरासरी ५ तासाचा विधी आहे.

वास्तूशांती

जनन शांती
जनन शांती जन्माच्या वेळेस असलेले वाईट नक्षत्र, तिधी, योग, कारण, किंवा इतर काही दोष असतील तर बऱ्याच वेळेला आपण केलेल्या कष्टाला फळ मिळत नाही किंवा आजारपण त्या व्यक्तीच्या मागे लागलेले असते तेव्हा वरील दोषाचा विचार करून मग वरील दोष जाण्यासाठी हा विधी करतात. या विधीला सरासरी ३ तास लागतात.
सध्या सगळीकडे वयाची ५० वर्ष, ६० वर्ष, ७० वर्ष, १००वर्ष पूर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु त्यात पाश्चिमात्य संस्कृतीचे आवलम्बन जास्त दिसते. आपल्या हिंदू संस्कृतीत हेच क्रार्यक्रम करण्याची पद्धती कैक हजार वर्षांपूर्वी आपल्या ऋषींनी सांगितली आहे यांचा म्हणून आहे कि वयाच्या विशिष्ट वर्षांनंतरी विशिष्ट देवतांचे आशीर्वाद घ्यावे कि जेणेकरून आपणास दीर्ध लाभून घेण्याची प्राप्ती होईल.
उदा. ५० या वर्षी वैष्णवी शांती, ६० या वर्षी उग्र्रथ , ७५ या वर्षी ऐन्द्री , ८० वर्षी सहस्रचंद्र इ.

वयासंबंधी शांती

नवग्रह शांती
कुंडलीतील जर ग्रहस्थिती समाधान कारक नसेल किंवा सतत कामात अडथळे निर्माण होत असतील तसेच कोणत्याही नवीन मोठया स्वरूपाच्या संदर्भातील व्यापार किंवा उद्योग सुरु करायचा असेल तर हा विधी करावा या मुलं कामात यश येवनू प्रगती होत.
सध्या आपण विचार केला तर जन्माला येणारे बाल यांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. आसे काही आजार यांना होत आहेत जे आपण मोठ्या माणसाच्या संदर्भात पूर्वी ऐकायचो. ब-याच बालकांच्या संदर्भात आपण म्हणू शकतो कि वयाच्या ८ वर्ष पर्येंतचा यांचा कालावधी हा खपू नाजकू आणि आरोग्याच्या संदर्भात तक्रारी करणारा असतो अश्यात आपल्या बालकास कोणतीही हानी होवू नये म्हणून या विधीची निर्मिती शास्त्रकारांनी केली

बाल रक्षा विधान

महा मृत्युजंय विधान
असाध्य आजाराने पिढीत ,अचानक निर्माण झालेली व्याधी तसेच जीवघेणा अपघात यातनू निर्माण झालेला त्रास किंवा जन्म कुंडलीच्या अनुसंगाने वाईट काळाची सुरुवात होणार असेल तर या विधीच चयन केले जाते. हा विघी केल्यानंतर वरील सर्व त्रासातून मनुष्याची सुटका होऊन मानसिक व शारीरिक स्वास्थ प्राप्ती होते हा आज पर्येतचा अनभुव आहे.
